आमचे प्रेरणास्थान : मिलिंद फणसे यांची गझल "झाले जुने नभाचे ते चंद्र, सूर्य, तारे" .

झाले जुने पतीचे ते पँट, शर्ट, सारे
बोहारणीस देते, चमचा नवा हवा रे

पत्नीस ड्रेस लागे, पल्लू शिरावरी अन्
मैत्रीण अल्पवस्त्रा चाले बरी तुला रे !

हा रँप की असे हा दुष्काळग्रस्त जिल्हा ?
अन्नान्न बायकांना मॉडेल करू नका रे

वाया अनेक गेले रांगेत तास माझे
पोटात या नळाच्या असतील थेंब का रे ?

घेतात लोक हल्ली खोकून श्वास येथे
धूरात प्राणवायू भेसळ करू नका रे

निर्धास्त व्हा गुरांनो, सरली उपासमारी
लालू न मुख्यमंत्री, चारा तुम्हीच खा रे

तू शीक खोडसाळा गंभीर काव्य करणे
करती टवाळकीचा आरोप वाचणारे

1 Comment:

  1. केशवसुमार said...
    वा गुरुजी,
    एकदम फरमास विडंबन आहे..
    मैत्रीण,मॉडेल,नळ, प्राणवायूची भेसळ , लालू खूपच वास्तववादी आणि बोचरे विडंबन
    मान गये..
    केशवसुमार..

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds