मनात माझ्या

अजब यांची मनात माझ्या ही गझल आम्हास खूप आवडली. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आम्हीही लिहिते झालो.

मनात माझ्या काही आता तगमग नाही
दीक्षित झाली नेने, आता धकधक नाही

रस्त्यावरती कसा पसरला सन्नाटा हा ?
कुणी न छेडी, कशी मुलांची शुकशुक नाही ?

प्रेम तुझ्यावर आहे माझे केव्हापासुन
तुझ्या मुखी पण कायम असते "नग, नग, नाही"

चेंडुफळीतुन कमविन म्हणतो पैसा थोडा
जाहिरातींची सोसत आता दगदग नाही

शून्यवीर ते ठरले राहुल, सचिन नि धोणी
'खोडसाळ' हा संघामध्ये का मग नाही ?

2 Comments:

  1. A woman from India said...
    बरं झालं सुटलात ते - राय ही होणार आहेत बच्चन, नकोतच आता कजारारे नैनन.
    चित्तरंजन भट said...
    मनात माझ्या काही आता तगमग नाही
    दीक्षित झाली नेने, आता धकधक नाही
    हाहाहाहाहाहा. जबरदस्त मतला आहे विडंबनाचा. क्या बात है. धकधक नाही

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds