अनंत ढवळे यांची "इतके धुळकट रस्ते इथले" ही गज़ल व त्यावर त्यांचा धोंडोपंतांबरोबर रंगलेला प्रतिसाद-रूपी कलगी-तुरा वाचण्याचे सौभाग्य आम्हास आजच प्राप्त झाले. म्हटलं आपणही जरा ती जमीन वापरून बघावी.

इतके तापट लेखक इथले
देवच जाणे काय बिनसले

बोट ठेवता उणिवांवरती
कविराजांचे पारे चढले

अर्थरिकामे, निव्वळ वारा
शब्द ढवळुनी काव्य प्रसवले

विकार जडतो आहे आता
(नको तिथे हे पाय घसरले)

उठता उठता विझल्या ज्वाळा
वैतागुन तू डोळे मिटले

गझल न कळली 'खोडसाळ' तुज
मक्त्याचे तुज अर्थ न कळले

2 Comments:

  1. चित्तरंजन भट said...
    इतके तापट लेखक इथले
    देवच जाणे काय बिनसले

    हाहाहा. मस्त विडंबन आहे खोडसाळा!!!
    धोंडोपंत said...
    वा वा खोडसाळपंत

    झकास विडंबन झाले आहे हो. आवडले.

    धोंडोपंत

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds