'कसे लिहावे...?..'

"कसे जगावे...?" हे आम्हांस शिकवल्याबद्दल आम्ही प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर, यांचे अत्यंत आभारी आहोत. त्यांच्या या ऋणातून काही अंशी तरी मुक्त होण्यासाठी आम्ही खालील ओळी प्राध्यापक डॉक्टर मजकुरांच्या चरणी सविनय अर्पण करीत आहोत.


'कसे लिहावे...?..' भान तिजकडे भटकत राही
लिहू कसे, ती समोर माझ्या मटकत राही

उभा जरी मी पहारेकरी दारावरती
क्षणाक्षणाला मुलगी खाली सटकत राही

पळून गेली कार्टी याचे दु:ख न मजला
हिला न नेले सोबत हे मज खटकत राही

पुसून माझी स्थावर-जंगम क्षेमखुशाली :(
जगास टवळी सांगत सत्ये भटकत राही

जवळ करी ती बंगला, गाडी, पैसा माझा
मलाच केवळ झुरळासम ती झटकत राही

1 Comment:

  1. Yogesh said...
    हा हा...
    पुन्हा लिहितो की ही कविता संदीप खरेच्या "आयुष्यावर बोलू काही" च्या चालीबरहुकूम म्हणता येते. :p

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds