आमचे प्रिय कविमित्र श्री. अनिरुद्ध अभ्यंकर यांच्या हसले होते निरोप घेऊन निघताना ने प्रेरित होऊन...

हसले होते निरोप देऊन वळताना
सुटकेचा निःश्वास टाकुनी पळताना

आठ जणांची गर्दी झाली दाराशी
काल मला खोलीत एकटी बघताना

तशीच असते खोली अस्ताव्यस्त तुझी
शिव्या घालते तुला रोज आवरताना

हसता डोळे फडफडून मी सगळ्यांशी
दिसायचा तू गोड किती जळफळताना

सांगत होते तुझ्या चहाड्या उशीस मी
तळमळते मी अन तू घोरत असताना

सांग कुठे या मित्रांना मी लपवावे
अवचित येता घरात तू ते असताना

गोष्ट खाजगी जगास का मी सांगावी
कार्य काय घडतात घरी तू नसताना

1 Comment:

  1. प्रशांत said...
    वाह! क्या बात है!

    खोडसाळपंत,

    मासद्वयानंतर केले तुम्ही विडंबन
    मजा आली या ब्लॉगवरी वाचियताना

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds