अशक्य केवळ - २

आमची प्रेरणा :- जयशी अंबासकर यांची कविता अशक्य केवळ


कशास वावर मनात केवळ ?
भ्रतार असला अशक्य केवळ

नको अता तुज वरणभात मी
हवी काकडी खमंग केवळ

तुझ्यामुळे ही सुषुप्त गात्रे
सदा घोरणे तुझेच केवळ

जरा तरी तुज हुक्की यावी
कसे करावे उपास केवळ

हवी नव्याने सख्या उभारी
किती कराव्या खोड्या केवळ ?

1 Comment:

  1. प्रशांत said...
    "शब्दबंध" ही मराठी ब्लॉगलेखकांची ई-सभा ६/७ जून २००९ रोजी संपन्न होणार आहे. अधिक माहिती http://marathi-e-sabha.blogpsot.com/ येथे. तसेच मराठी ब्लॉगविश्वच्या ब्लॉगवर मिळेलच. सहभागी होण्यासाठी shabdabandha@gmail.com येथे लवकरात ईमेलद्वारे संपर्क साधावा, ही विनंती.

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds