प्रेरणा : मानस६ ह्यांची सुंदर गझल "वादळाची ह्या जगा चाहूल जेंव्हा लागली"

तांदळाची ह्या घरा चाहूल जेव्हा लागली
भात सार्‍या रांधती, मी खीर, चकली रांधली!

शेवटी आलास सगळ्यांच्या वसंता, Hi, पण;
आज माझी डायरी आहे फुल्यांनी झाकली!

जावयाच्या चाचणीला पास झाली शेवटी
चप्पला झिजल्या खर्‍या, पण घोडनवरी चालली!

चालतो मी पावसातुन एवढ्यासाठीच की,
ना कुणालाही दिसावी पँट ही ओलावली!

वर्ग ह्याचा कोणता, काढा बरे घनही जरा;
कॅल्क्युलेटरची कशाला गरज भासू लागली?

स्वाद तोंडाला हवा लावण्यगीताचा, सखे!
भावगीती गुळमटाची सवय मागे सांडली

दूरदेशी वाहते माझी प्रिया माझ्यापुनी
गावली मज नाय, हिरव्या कार्डवाल्या गावली!

अंग उघडे.. कापडाने व्यापले होते कमी!
विघ्नसंतोषी कुणी पण शाल त्यावर टाकली!
-खोडसाळ

1 Comment:

 1. Anonymous said...
  पहिलं कडवं अगदीच फालतू वाटलं, बाकी विडंबन खूपच छान.

  > गावली मज नाय, हिरव्या कार्डवाल्या गावली!
  >
  'कार्डवाल्याला' हा अर्थ 'कार्डवाल्या' पेक्षा 'कार्डवाल्यां' शब्दानी जास्त चांगला व्यक्त होतो का? बहुतेक होतो.
  काय तुम्हां वाटते या प्रांजळा सुचनेविषीं ?
  खोडसाळा अर्पितो मी कौतुकाची पावती

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds