शस्त्रे

आमची प्रेरणा : प्रदीप कुलकर्णी ह्यांची गझल "वस्त्रे"


लेखणी परजून आलो तुजसवे आता पुन्हा !
ये जरा मोडू तुझे गाणे नवे आता पुन्हा !

आज मी आलो जरा जोशात आणिक नेमके
दार शेजारी अवेळी ठोठवे आता पुन्हा !

कोण नक्की पाहिजे ते येत नाही सांगता
देखणे कोणीतरी पण मज हवे आता पुन्हा !

मी सुखाचा एक मोका घेतला केव्हातरी...
आठवी तो चोप अन्‌ ते काजवे आता पुन्हा !

पान सोडा, देठही उरले न हिरवे एकही...
का तरी दिसता थवे मज खवखवे आता पुन्हा ?

दूर दे फेकून शस्त्रे वक्र-उक्तीची जरा...
रुष्टले, खोड्या, पहा कविपुंगवे आता पुन्हा !

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds