काव्यलेखनातून भरघोस कमाई कशी करावी: एक सहा-सूत्री योजना

मायकल लुईस ह्याने जुलै २००५च्या पोएट्री मासिकात लिहिलेल्या, नंतर पोएट्री फाउन्डेशन ह्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या औपरोधिक लेखाचा अनुवाद.


) सकारात्मक विचार करा. रडगाणी गाणारी माणसे कोणालाही आवडत नाहीत. अन्‌ कवींचा भर कायम नकारात्मक गोष्टींवर असतो. नुकतेच कोणीतरी मला ह्याचे एक उत्तम उदाहरण दाखवले. कवीचे नाव आहे विलियम कार्लॊस विलियम्स:
It is difficult
to get the news from poems,
yet men die miserably every day
for lack
of what is found there.


मला विलियम विलियम्सवर उगाच टीका करायची नाही आहे. निदान त्याच्या डोळ्यांसमोर सर्व चित्र स्पष्ट तरी आहे: अमेरिकी लोकांना वाचायला काही तरी कारण लागते. एकदा ते सापडले की प्रश्न मिटला! इतर कोणत्याही देशातील वाचक पुस्तकांतून महत्त्वाची माहिती शोधण्यासाठी एवढी मेहनत करत नाहीत. आणि हेही खरे आहे की त्यांना बातम्या वाचायला आवडतात. पण इथे विलियम्सने दोन मोठ्या चुका केलेल्या आहेत: ) अमेरिकी माणसांना सुरवातीलाच पुढचे सर्व किती अवघड असणार आहे हे सांगीतलेले आवडत नाही; आणि ) मृत्यूला खप नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. कसे मरावे ह्याचे ज्ञान अमेरिकी माणसांना नको असते. त्यांना वजन कसे कमी करावे, श्रीमंत कसे व्हावे, शिश्नोत्थापन कसे टिकवावे ह्याची माहिती हवी! सदोष उत्थापनावर काव्य केलेत तर तुम्हाला बिले भरणे सहज परवडू लागेल. इतका पैसा कमवाल की तुम्हाला तुमच्या मृत्यूची पर्वा उरणार नाही.


) तुमची नवी सकारात्मक वृत्ती तुमच्या गिर्‍हाईकांना दिसू द्या. गिर्‍हाईक हा तुमचा मित्र आहे. तुमची नेहमीची प्रातिनिधिक कविता गिर्‍हाईकाकडे लक्षच देत नाही. माझ्या मते अनेक कवी त्यांचे आत्यंतिक निष्ठावंत वाचक, ज्यांचा अजून जन्मच झालेला नाही, अशांना सोडून बाकी सर्वांचा द्वेष करतात. बहुधा त्यांची मदार भविष्यातील सैद्धांतिक माणसांवर असावी. त्यामुळे साक्षात जिवंत माणसांच्या मतांकडे दुर्लक्ष करायला आपण मोकळे आहोत असे त्यांना वाटते.


पण गाड्यांना लावलेल्या स्टिकर्सवर लिहिलेले नसते का- “DENIAL ISN’T A RIVER IN EGYPT” ? (त्यावर जरा विचार करा.) अवकळालेल्या धंद्याचे लक्षण आहे हे. कोळशाच्या खाणीतील कामगार, स्टीलच्या कारखान्यातील कामगार, फॉर्ड एक्स्प्लोरर गाडीचा आराखडा बनवणारे: हे सारे हल्ली आपला बराचसा वेळ कॅन्टीनमध्ये बसून जगाची कशी वाट लागली आहे ह्यावर कुरकुरत असतात. तुम्हाला जर कवी-उद्योजक व्हायचे असेल तर दूताला दोष देऊ नका. जिवंत माणसांना तुमच्या कविता वाचायच्या नाहीत हा काही त्यांचा दोष नाही. लोकांचे काय कसे चुकते ह्याचा विचार करण्यात जो वेळ घालवता त्यात स्वत:च्या कविता दुरुस्त करा. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर:


) तुम्हाला नेमके काय सांगायचे आहे त्याचा विचार करा. सामान्य वाचकाला थोडेलंकारिक लेखन पसंत असले तरी शेवटी त्याला हा प्रश्न पडतोच की ह्यातून मला काय मिळाले? ह्याचे सार काय? आणि तुमची इच्छा नसली तरी त्याला अपरिहार्यपणे हा प्रश्न पडणारच: ह्या कवीच्या म्हणण्याला काही अर्थ आहे का? अर्थात, मांडणीतील गुंतागुंत वाढवून कवी अर्थाविषयीच्या प्रश्नांना टाळू शकतो. पण शेवटी चाणाक्ष वाचकाला वेष्टनातील वस्तू दिसणार. म्हणूनच स्वत:ला विचारा: माझ्या काव्यात काही तथ्य आहे का? की नुसतीच हवा भरलेली आहे?


मी असे म्हणत नाही की तुम्ही प्रत्येक वेळी सत्य बोलायला हवे. पण त्याचा जवळपास तरी असणे आवश्यक आहे. विलियम विलियम्स एकटेच असे करतात असे नाही, पण समस्येचे उदाहरण म्हणून त्यांची उपरोल्लेखित कविता पहा. एक तर जे कवितेतून बातम्या शोधतात त्यांना इतरांपेक्षा चांगले मरण येते हे मला पटत नाही. पण समजा ते खरे असले, तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. उलट कवीच गळफास लावून नाहीतर गॅसच्या शेगड्यांमध्ये डोके घालून, नाहीतर पिऊन पिऊन आत्महत्या करत असतात. सध्यातरी बहुतेक लोक दु:खीकष्टी मृत्यू हे कवीचे लक्षण समजतात. म्हणून पुढचे सूत्र:


) सुसंबद्ध लिहिण्याचा प्रयत्न करा. एकदा तुम्हाला अर्थपूर्ण लिहिणे जमू लागले की मग लोकांना रस असेल अशा विषयावर अर्थपूर्ण लिहा. हे सहजासहजी होणार नाही. यश कष्टसाध्य असते. पण जरा आजुबाजुला बघा! कवितेतून बातम्या काढून घेणे अवघड असले तरी कवितेत थोड्याशा बातम्या घालणे सोपे आहे. हे जुजबी उदाहरण पहा: रेस्टॉराँमध्ये एका बाईला तिच्या ताटात एक मानवी बोट सापडते. किती तरी दिवस ही बातमी सर्वतोमुखी असते. त्या रेस्टॉराँचा धंदा बसत जातो. लोकांना कल्पनेनेच मळमळू लागते. अन्तुम्ही बसून त्यावर एक कविता रचता:


'पोटभर बोट',
कवी <इथे स्वत:चे नाव लिहा>


तुमच्यात लिहिण्याची हिमंत असली तर लोक नक्की वाचतील.


) भीतीवर मात करा. माझा अंदाज आहे की ह्या क्षणाला तुम्ही असा विचार करत असाल, ठीक आहे, वाचकांच्या घाऊक बाजारपेठेपर्यंत कसे पोहोचायचे ते समजले, पण इतर कवी माझ्याबद्दल काय म्हणतील? बरोबर आहे तुमचे. त्यांना तुमचा मत्सर वाटेल, हेवा वाटेल. पण काळजी करू नका, ह्या परिस्थितीत तुम्ही एकटे नाहीत. गेल्या काही वर्षात प्रकाशित काही कवितासंग्रह चाळताना मला नावाच्या (आडनाव नाही!) कवयित्रीची "डेल्युजन" नावाची कविता सापडली. तिची सुरुवात अशी आहे:
I watched the Trade Center Towers
burning, then collapse
repeatedly on television
until I could see them clearly
when I shut my eyes.
The blackened skies even blotted out my vision,
until I screamed and threw myself on the floor


पहा! असे काहीतरी करता येते. हा पुरावा आहे की पुरस्कारप्राप्त कवी ( दुसर्या कुठल्या प्रकारचे कवी असतात का?) वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरची एखादी बातमी घेऊन ती कवितेत कोंबू शकतो, तरीही ताठ मानेने राहू शकतो. पण तुम्हाला म्हणून सांगतो, मला असे वाटते की ऐच्या मानेवर एक भूत बसले आहे - यशाच्या भीतीचे भूत. वाचक म्हणतो, “आता कसं बोललात! वर्ल्ड ट्रेड सेंटर पडताना मीही टिव्हीवर पाहिलं, पाहतो काही आतल्या गोटातील खबर मिळवून वेगळ्या पद्धतीने कवितेत मांडता येते का.पण ऐनी काय केले? वर्ल्ड ट्रेड सेंटरला बाजुला सारून आपल्या बहिणीची रडकथा सांगत बसली. !


) शेवटचे सूत्र: व्यापक विचार करा! तुम्ही सारे कवी असे कूपमंडूक कसे हो? एक उदाहरण देतो. गेले काही महिने कॅलिफॉर्निया नव्या राजकवीच्या शोधात आहे. पगार फक्त सालाना दहा हजार, पण ते तूर्तास बाजुला ठेवू. त्यांना नवा राजकवी हवा आहे कारण आधीचा राजकवी, क्विन्सी ट्रूप, ह्याने आपल्या अर्जासोबत जोडलेल्या माहितीत आपण ग्रॅंब्लिंग विद्यापीठाचा पदवीधर असल्याची थाप मारली होती. ही बातमी फुटल्यावर त्याला बडतर्फ करण्यात आले. तुम्हाला खोटे वाटेल, पण अशी कुलंगडी काव्यासाठी चांगली असतात. म्हटलेच आहे, “येन केन प्रकारेण प्रसिद्ध: पुरुषो भवेत्‌". लोकांनी ट्रूपगेटमधून हाच धडा घेतला की राजकवीचा हुद्दा बायोडेतात खोटी माहिती पुरवण्याइतपत मोठा मोलाचा असतो.


अरे पण कवींनो, थापाच मारायच्या तर स्वत:ला ग्रॅंब्लिंगचा स्नातक कसले म्हणवता? त्यापेक्षा हार्वर्डचे म्हणा. वर युद्धात वीरश्री गाजवल्याची, खेळात प्रवीण असल्याची, वा तत्सम कसली तरी फोडणीही द्या त्या बायोएटाला. निदान कवीची पुचाट प्रतिमा थोडीशी पुसट तरी होईल.


मी वर म्हटलेले बरेचसे स्वप्नरंजनात्मक, अशक्यप्राय आहे. त्यामुळे शेवटी एक सोपा उपाय सांगतो. कोणताही खटपट्या कवी सहज दुरुस्त करू शकेल अशी एक उघड खोट आहे कवितेच्या धंद्यात: वैयक्तिक स्वच्छतेचा पूर्ण अभाव. मी अनेक कवी पाहिले आहेत. काय तो अवतार! प्रत्येक वेळी तुमच्यापैकी कोणी भेटला की मी त्याला विचारतो, “कवीने आकर्षक दिसू नये असा कायदा आहे का?” तुमच्या पूर्वसुरींमध्ये काही अतिशय देखणे होते, त्यांचा धंदाही जोरात चालायचा. पण ते सारे केव्हाच मेले आहेत. त्यांच्यासारखे काही जिवंत कवी शोधा. त्यांना प्रोत्साहन द्या. मग बघा, त्यांच्या बातम्यांवर लोक कसे उड्या टाकतात ते.  

Newer Posts Older Posts Home

Blogger Template by Blogcrowds