अखाडा...आमचाही

आमचे परम-मित्र श्रीयुत धोंडोपंत यांच्या अखाडा या गझलेवरून प्रेरणा घेऊन आम्हीही लेखनाच्या अखाड्यात उतरून धूळपाटीवर चार-दोन ओळी खरडण्याचे औद्धत्य करीत आहोत.

बॉस मज बोले कडाडा
"रोज सबबी, रोज खाडा"

तो पहा मेमो मिळाला
नोकरी झाली अखाडा

इन्क्रिमेंट नाही मिळाली
बढतिचाही साफ राडा

कर्णकर्कश गीत माझे
सूरही थोडा भसाडा

ती उभी सौधात आहे
खोल की तूही कवाडा !

काय मी केले कळेना ?
लावला आहेस टाडा !

हासते माझ्यावरी ती
पाहुनी माझा खुराडा

खोडसाळा ही न कविता
फक्त शब्दांचा चुराडा

2 Comments:

 1. ..... said...
  वा वा वा वा,
  खोडसाळपंत,

  विडंबन फारच छान झाले आहे.

  बॉस मज बोले कडाडा
  "रोज सबबी, रोज खाडा"

  तो पहा मेमो मिळाला
  नोकरी झाली अखाडा

  हा हा हा हा हा.

  काय मी केले कळेना ?
  लावला आहेस टाडा !

  हा हा हा हा हा

  आपला,
  (हसरा) धोंडोपंत
  तात्या अभ्यंकर. said...
  अच्छा! म्हणजे खोडसाळरावांचे पडद्या आडून का होईना, मिसळपाववर येणेजाणे असते म्हणायचे! वा वा! ही अतिशय चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे! :)

  बहुधा मनोगतावरील वेलणकरकाकांनी घालून दिलेला सभ्यतेचा, सुसंस्कृतीचा आणि कसला कसला पायंडा खोडसाळरावांना जिंदादिलीने आणि उघडपणे 'खोडसाळ' या नावानिशी मिसळपाववर वावरण्याच्या आड येत असावा! :)

  'असभ्य, असंस्कृत आणि शिवराळ अश्या तात्याच्या संकेतस्थळावर दाखल झालो तर वेलणकरकाकांना आणि इतर सभ्य आणि सुसंस्कृत मनोगतींना वाईट नाही का वाटणार?' हेही संकट कदाचित खोडसाळरावांना पडलं असावं! :)

  असो, विडंबन बाकी मस्तच हो!

  तात्या.

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds