आमचे प्रेरणास्थान : चित्त यांची अप्रतिम गझल "कोणत्या चिमटीत मी त्याला धरू ?"
कोणत्या नाक्यावरी त्याला धरू ?
हिंडते गल्लीत जे फुलपाखरू
तू अता बघशील वाता - हत खरी
लागले पाणी-पुरीने डरडरू
गायही तेव्हाच गोठा सोडते
लांबुनी जर बैल लागे हंबरू
खुणवती सार्या पुरातन 'ओळखी'
पाहुनी लागे नवी ही कुरकुरू
सुळसुळाया लागली झुरळे किती !
केवढी दिसतात, चल कल्ला करू
चालवू माझे विडंबन - हल किती ?
केवढे लिहितात हे कविकुलगुरू
---------कलम १ -----------------
खूप पल्लेदार आहे माल पण
वाचताना श्वास लागे घरघरू
आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिशी कापू, जरा वस्त्रा धरू
ढापण्यांनी रूप आहे देखले
यंग कुठले सांग आहे पाखरू ?
ओठ, बांधा, केस, बाहू अन् कटी
(हे धरू की ते धरू की ते धरू)
१. मराठीत किंवा - नाही, फक्त मराठीतच - विडंबकाला एखादे विडंबन (कितीही ओळींचे) करायचे असते तेव्हा त्या ओळींच्या वर किंवा मध्ये किंवा दोन ओळींच्या मधल्या मोकळ्या जागेत किंवा जिथे जागा मिळेल तिथे

Labels: विडंबन
प्रेरणा : जयन्ता५२ यांची गझल "माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे"
माझ्या तुझ्यात काही, काही असे घडावे
सांगू नये जगाला, चुपचाप निस्तरावे
पंचांग म्हणत कुठले की आजची अमावस ?
'दाते' न 'कालनिर्णय', बहुधा 'टिळक' असावे
आडून चौकशी का होते जनांकडूनी
इतक्यात सर्व लफडे त्यांच्या पुढ्यात यावे ?
अफवा कशा पसरल्या गावात जाणतो मी
बघुनी मुले तुझे ते रेंगाळणे असावे
माझ्याच बायकोची ही काय राजनीती ?
सोडून कक्ष माझा मजलाच घालवावे
"माझ्याच कुंकवाची ही काय कार्यरीती ?
संघात दक्ष आणिक कक्षात सुस्त व्हावे"
-----------------------------------
खोडसाळ
Labels: विडंबन
आमची प्रेरणा : अनिरुद्ध१९६९ यांची सुंदर गझल "आज अचानक तुझी आठवण का यावी"
आज अचानक तुझी आठवण का यावी
विजार सारी ओली माझी का व्हावी ?
भात, डाळ या गोष्टी का झाल्या नाही
पुर्या लाटल्या असतील, चटणी वाटावी
जुन्या वहीची पीत वेष्टनातिल पाने
अकस्मात पत्नीने येउन उघडावी
बरेच काही घडले ह्या मधल्या काळी
तुझी निशाणी जगा कशी मी दावावी ?
अर्थ उतरण्या शब्दांमध्ये घाबरले
भीती इतकी कवड्याची का वाटावी ?
तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
किती मुक्याने परंतु कटकट सोसावी ?
हिशोब केला तुवा दिलेल्या पोरांचा
समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी
पुन्हा तोच तो ऊस उगावा कवितेचा
पुन्हा त्याच चरकातुन यमके काढावी
गझल पाडणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते तुला उपरतीही व्हावी
मनात आहे खोडसाळ दडला माझ्या
आज उडी अनिरुद्ध कवींवर मारावी
Labels: विडंबन