प्रेरणा : मिलिंद फणसे ह्यांची गझल "लाभली नाही कधीही"
लाभली नाही कधीही स्वस्थता त्याच्या जिवाला
आस जो रोमॅन्सची घेउन उभा लग्नास झाला
काल वर, खाली उद्या हे बायकोचे प्रेम लहरी
आज माहेरी पळाली यौवनी घालून घाला
दंशही झाकून असतो अन् नखांची खूणही मी
हो, फुकट कार्यालयी ते पाहुनी थट्टा कशाला ?
सर्व शस्त्रांहून भीतो टीचभर त्या बायकोला
चढवली साक्षात मी रणचंडिका पत्नीपदाला
गालिचे, गाद्या, उश्या अन् चादरी कंटाळलेल्या
बायको माडीवरी ज्ञानेश्वरी घेते उशाला
प्रेमवीरांनी शिकावे खोडसाळापासुनी की
तारखांची चूक नेते ओढुनी त्या बोहल्याला
मूळ गाणे : "सारंगा तेरी याद में"
http://youtu.be/8BZt0l8VzH4
हे ऐकून डोक्यातील किडा वळवळू लागला, व खालील ओळी सुचल्या.
सऽरंगा तेरी याद में जीभ हुई बेचैन
तीखे तुम्हारे स्वाद बिना
दिन कटते नहीं रैन, हो~
सऽरंगा तेरी याद में ...
वो इमली का घोल और हलदी, मिरची, तेल
कैसी खुशबू देता था अद्रक-लसन मेल
आज किधर को खो गयी
वो मछली की गैल, हो ...
सऽरंगा तेरी याद में ...
संग कबाब-ओ-तंदुरी, बीअर के दो घूँट
होते थे मेरे सामने. पडता था मैं टूट
सुख लेके दुख दे गयीं
क्यों, धीवरी, तू रूठ ? ...
सऽरंगा तेरी याद में ...
सऽरंगा तेरी याद में जीभ हुई बेचैन
तीखे तुम्हारे स्वाद बिना दिन कटते नहीं रैन
अब घर के रसोई में चलत बिरहा समीर
बाट तकूँ तेरी, सऽरंगा, आँखों में है नीर
Labels: विडंबन
आमची प्रेरणा : प्रदीप कुलकर्णी ह्यांची गझल "वस्त्रे"
लेखणी परजून आलो तुजसवे आता पुन्हा !
ये जरा मोडू तुझे गाणे नवे आता पुन्हा !
आज मी आलो जरा जोशात आणिक नेमके
दार शेजारी अवेळी ठोठवे आता पुन्हा !
कोण नक्की पाहिजे ते येत नाही सांगता
देखणे कोणीतरी पण मज हवे आता पुन्हा !
मी सुखाचा एक मोका घेतला केव्हातरी...
आठवी तो चोप अन् ते काजवे आता पुन्हा !
पान सोडा, देठही उरले न हिरवे एकही...
का तरी दिसता थवे मज खवखवे आता पुन्हा ?
दूर दे फेकून शस्त्रे वक्र-उक्तीची जरा...
रुष्टले, खोड्या, पहा कविपुंगवे आता पुन्हा !
Labels: विडंबन
प्रेरणा : कळ्यांना जागवूनी बोलले दव
कळ्यांच्या बोलण्याने लाजले दव
"पुरे दो-चार घटकांचेच शैशव"
प्रिये, कंठात कोकिळ-स्वर असावा
पहाटे का तुझा हा कर्कशारव ?
अता कटवावयाची वेळ झाली
सख्याच्या मागण्या हल्ली अवास्तव
मधाचे बोट दिधले, खूप झाले
उधारीवर हवे मेल्यास अर्णव!
दवाला स्पर्श अन् चुंबन अलीला
नि तिसर्याशीच चाले नेत्रपल्लव
ढगळ पोषाख घालुन स्थूल झाकी
स्वत:चे धष्ट आणिक पुष्ट सौष्ठव
जराही ना चुकवता कर्ज बुडणे
असे याहून काही खाद्यलाघव?
किती, रे, खोडसाळा, दांडगाई
कवन दिसताक्षणी हातास खवखव... (कधी तूही कवी होतास, आठव)
------------------------------------------------------------------------------
ता. क.
किती भाषा तुझी, रे, संस्कृतोद्भव ?
गमे मज कवन तव गीर्वाणकर्दम
इत: तत्सम, तत: तव शब्द तद्भव

Labels: विडंबन