प्रेरणा :  कळ्यांना जागवूनी बोलले दव

कळ्यांच्या बोलण्याने लाजले दव
"पुरे दो-चार घटकांचेच शैशव"

प्रिये, कंठात कोकिळ-स्वर असावा
पहाटे का तुझा हा कर्कशारव ?

अता कटवावयाची वेळ झाली
सख्याच्या मागण्या हल्ली अवास्तव

मधाचे बोट दिधले, खूप झाले
उधारीवर हवे मेल्यास अर्णव!

दवाला स्पर्श अन्‌ चुंबन अलीला
नि तिसर्‍याशीच चाले नेत्रपल्लव

ढगळ पोषाख घालुन स्थूल झाकी
स्वत:चे धष्ट आणिक पुष्ट सौष्ठव

जराही ना चुकवता कर्ज बुडणे 
असे याहून काही खाद्यलाघव?

किती, रे, खोडसाळा, दांडगाई
कवन दिसताक्षणी हातास खवखव...         (कधी तूही कवी होतास, आठव)
------------------------------------------------------------------------------
ता. क.

अरे भुंग्या, मराठी शीक थोडी
किती भाषा तुझी, रे, संस्कृतोद्भव ?

गमे मज कवन तव गीर्वाणकर्दम
इत: तत्सम, तत: तव शब्द तद्भव  

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds