फार(च) झाले


धोंडोपंत आपटे यांच्या फेसबुकवरील  सुंदर गजलेच्या केशवसुमारांनी मनोगतावर केलेल्या गंभीर विडंबनाचे खोडसाळ विडंबन.

आज भर दिवसात म्हणजे फार झाले
प्रेम ना काबूत म्हणजे फार झाले

कोण दिसली हे असे स्वारीस ठाउक
मागुनी जातात म्हणजे फार झाले

नाहती कांता कधी होणार आता
मोजती वर्षांत म्हणजे फार झाले

दुष्ट हे सारे जरी नवरे तरीही
झिंगुनी येतात म्हणजे फार झाले

बसमध्ये आहे जरी गर्दी तरीही
झोंबुनी घेतात म्हणजे फार झाले

बोलण्याची स्पष्ट हे नाही मुभा पण
रात्रभर छळतात म्हणजे फार झाले

लाज तर काढेल ती दुनियेसमोरी
चोप भर रस्त्यात म्हणजे फार झाले

वेष तव पाहून होतो पेटलेला
मोजशी पोरात म्हणजे फार झाले

काव्य ते पाहून "खोड्या" पेटलेला
तो कवी तोर्‍यात म्हणजे फार झाले

0 Comments:

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds