ट-ला-ट

पुढील विडंबन हे कोणत्याही विशिष्ट गझलेचे किंवा कवितेचे नसून ट-ला-ट प्रवृत्तीचे आहे. गझलेचे सारे तांत्रिक नियम पाळल्याने फार तर तिचा निर्जीव सांगाडा निर्माण होईल. काव्याचा प्राणवायू त्यात फुंकल्याशिवाय त्या सांगाड्याचा उपयोग काय? वानगीदाखल माझा खालील ट-ला-ट उपद्व्याप पहा :

मी मनावर प्रेम केले
तू तनावर प्रेम केले

प्रीत माझी शुद्ध होती
तू जनावर-प्रेम केले

संयमाने प्रेम खुलते
तू अनावर प्रेम केले

प्यार मज होती गरीबी
तू धनावर प्रेम केले

मज किलोने मोद होई
तू टनावर प्रेम केले

आस शहराची मला अन
तू वनावर प्रेम केलेआहे की नाही निरर्थक तुकबंदी ? म्हणूनच कोणीतरी (?विंदा) म्हटले आहे - "कवी थोडे, कवडे फार"

1 Comment:

  1. Sumedha said...
    मज किलोने मोद होई
    तू टनावर प्रेम केले

    sahi! lol!

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds