मी कवी नाही, मला हा गंड आहे
यमकबाजीची तरीही कंड आहे
'र' पुढे 'ट' ठेवुनी उजळून जातो
व्योम कविता; आणि मी मार्तंड आहे!
वाचल्यानंतर शिव्या घालो कुणीही
छापला नुकता दहावा खंड आहे
वृत्त अन् बाराखडी झेपे न जेव्हा
मुक्तछंदातून केले बंड आहे
व्याप्त कवितेच्या जमीनी झोपड्यांनी
पण विडंबन मोकळा भूखंड आहे
काळजी निवृत्त होण्याची कशाला ?
काफ़ियांची बँक आहे, फंड आहे
बोलले काका, विडंबन हे नसावे
ऐकुनी ते, गर्व मम शतखंड आहे
प्रौढ अन् गंभीर कविता शीक, लेका!
लांबले, खोड्या, किती पौगंड आहे...
1 Comment:
Subscribe to:
Post Comments (Atom)
काव्य शोभे, गर्व जरी शतखंड राहे
प्रौढ अन् गंभीर कविता का शिकाव्या
खोडसाळा, बंड तव बलदंड आहे
छान हझल! सुरेख!!