आमचे प्रेरणास्थान : एका तळ्यात होती बदके पिले सुरेख.
आमच्या प्रेरणास्थानाचे प्रेरणास्थान : The Ugly Duckling

एका घरात होत्या बाया कजाग दोन
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

कारण लहानसेही भांडावयास चाले
आई व बायकोचा नेहमीच वाद चाले
दोघी तयास टोची, दिसतो हताश, दीन
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

पुरुषास दु:ख भारी, भोळा रडे स्वत:शी
पोरेहि ना विचारी, सांगेल तो कुणाशी
कर्तेपदास त्याच्या देती मुळी न मान
होता पुरूष तिथला धारून फक्त मौन

एके दिनी परंतु पुरुषास त्या कळाले
संकोच, लाज सारे वार्‍यासवे पळाले
चाले घराघरातुन डिट्टो असाच सीन
त्याचेच त्या कळाले सारे पती समान...

2 Comments:

  1. Anonymous said...
    साहेब: विडंबन उत्तम आहे. तुमच्या रचनेत बराच नवशिकेपणा आहे, पण काही हरकत नाही. एकूण प्रकार ज़मून आलाय, आणि ते जास्त महत्त्वाचं.
    Anonymous said...
    वा, वा, मजा आली वाचून.

    चाले घरोघरी हा, डिट्टो असाच सीन - या ओळीतले इंग्रजी शब्द तिथे चपखलपणे बसल्यासारखे वाटतात.

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds