पळुन मी गेलो जसा

पळुन मी गेलो जसा, आधी कधी पळलोच नाही
रामदासांच्या परी मी मागुती वळलोच नाही

जन्मभर पत्नीस माझ्या मी दिले नाना बहाणे
जायचे सवतीघरी पण मी कधी चुकलोच नाही

कैकदा कैफास माझ्या घेतले मी टीममध्ये
विश्वचषकालाच नेऊ, हाय, मी शकलोच नाही ।

रात्रभर माझी-स्मिताची बालके सांभाळली मी
शेवटी निजलो असा की मग पुन्हा उठलोच नाही ।

स्मरतही नाहीत आता चेहरे ते मैत्रिणींचे
एवढे स्मरते कधीही अडकुनी पडलोच नाही ।

वाटले चुंबन मिळावे, ओठ पण झाले तिऱ्हाइत
दिसत होती रोज ती पण मी तिला दिसलोच नाही ।

सबब आहे खोडसाळा आंधळ्या कोशिंबिरीची
झोंबण्याचा एकही मोका कधी चुकलोच नाही ।

आमची प्रेरणा - कविवर्य सुरेश भट ह्यांची गझल 'जगत मी आलो असा की...'

1 Comment:

  1. आशुतोष said...
    खोड्साळ पंत,
    तुमची मनोगत वरील सर्व विडंबनं वाचली आणि त्यामुळे मी तुमचा एक पंखा आहे. :)
    पण या विडंबनात तितकी मजा आली नाही...
    आशुतोष

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds