वर्मावर बोट

पुलस्तींच्या गझलेने आमच्या अगदी वर्मावर बोट ठेवलं. त्यामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आम्ही नेहमीप्रमाणे लेखणी हातात धरली.


पान आहे, कात आहे, भरवणारी नार आहे
हा चुना तळव्यावरी, हा तीनशेचा बार आहे

शिंग कोणी फुंकले की गाय लागे हंबराया
शिंग हे होते जयाचे तो तिचा का यार आहे ?

व्यर्थ ते ठरले महात्मे चोर जे होऊन गेले
हा वसा आहे कुणाचा, हा कसा व्यभिचार आहे ?

बडवते घरच्या धुण्यासम, घालते पत्नी धपाटा
मी रमावे मग इथे का? स्टेपनी तय्यार आहे!

जाहले पोटात का तव 'खोडसाळा' 'काव्य'जंतू ?
नित्य शब्दांचा तुला हा जाहला अतिसार आहे !

2 Comments:

 1. आशुतोष said...
  छान आहे...मस्त आहे...अगदी "खोडसाळ स्टाईल" आहे
  शिंग तर उच्च आहे !!!
  रोहित said...
  खोडसाळसाहेब, तुमची नोंद वाचून मुरकुंडी वळली. तुम्ही आमच्या हसण्याच्या वर्मावर बरोब्बर बोट ठेवलंय. तुम्ही तुम्हांला कविता जमत नाही म्हणून विडंबनाच्या मागे लागलाय असं म्हणता, पण या नोंदीवरून तसं वाटत नाही बुवा. तुम्हांला एकच विनंती आहे - शब्दांचा अतिसार त्रास देत असेल तर आमच्यासाठी सहन करा. कुटजारिष्ट घेऊन तो थांबवू नका.
  आणखी एक विचारू का? - रागवू नका. शिंगाची कल्पना उत्तम आहे, पण ती योग्य नाही वाटली. शिंग हे वाद्य केवळ त्या आकाराचं असतं म्हणून त्याला शिंग म्हणतात, असं मला वाटतं. बैलाचं शिंग तिथे वापरत नसावेत बहुधा. कवितेचं असं शवविच्छेदन करू नये, पण रहावलं नाही.
  ईश्वर आम्हाला तुमच्या रचनांचा असाच लाभ देत राहो ही प्रार्थना.

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds