ढापणा

संपदाताईंच्या रितेपणाने प्रेरित होऊन आम्हीही कळफलक जरासा बडवायचा ठरवला.काय करणार, अखेर "महाजनो येन गता: स: पंथ:" (संस्कृतातील चुकभूल द्या. घ्या.)


पुन्हा पुन्हा मला वळून पाहतोय ढापणा
नवीन आज पाखरास शोधतोय ढापणा

निशा-उषा जरी घरात येत-जात सारख्या
तरी प्रभा मिठीत, हाय, ओढतोय ढापणा

न आठवे कसा, कधी, कुठून पोचला घरी
घुसून वर कडी हळूच लावतोय ढापणा

लबाड रास खेळतोय, गोपिके जपून ग
इथे-तिथे हळूच बोट लावतोय ढापणा

करात माळ घेउनी लबाड 'खोडसाळ' तो
वरात माझिया घरीच आणतोय ढापणा

1 Comment:

  1. Anonymous said...
    हाहा खोडसाळपंत!
    महाजन वगरे म्हणून माझा प्रमोद महाजन करता की काय आता? तुमच्यासरख्या विडंबन राजपुत्राने(सम्राट म्हणणार होते पण ती गादी माफीपंतांनी केंव्हाच पटकावली आहे.. :( ) माझ्या कवितेचं विडंबन करावं हा बहुमानच आहे माझा! की सध्या कच्चामाल बंद झाल्यामुळे आमच्यासारख्या शिकाऊ टारगटांवर(सॉरी टार्गेटांवर) गुजराण करावी लागतेय?
    वि्डंबन थोडेसेच आवडले. हा ढापणा म्हणजे वेषांतर केलेला जेम्स बॉंड आहे की काय?

Post a CommentNewer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds